भक्ति धर्मस्त्रोतम् मारुती स्तोत्र।। Maruti Stotra June 20, 2019 FacebookTwitterPinterestWhatsApp मारुती स्तोत्र मारुती स्तोत्र – भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥ महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका ॥२॥ दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा । पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥ लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥ ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥ ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥ पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं । सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥ ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥ कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे । मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥ आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥१०॥ अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें मेरु- मांदार धाकुटे ॥११॥ ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके । तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥ आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥ धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥ भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही । नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥१५॥ हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी । दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकला गुणें ॥१६॥ रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू । रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥१७॥ ॥इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम ॥ ॥ श्री मारुति स्तोत्रम् संपूर्णम् ॥ मारुती स्तोत्र